---Advertisement---

एक उत्तम बिझनेस आयडिया कशी शोधायची | How to find a good business idea

By आपला बिझनेस

Updated on:

Follow Us
एक उत्तम बिझनेस आयडिया कशी शोधायची | How to find a good business idea
---Advertisement---

आजच्या इंटरनेटच्या युगात एक यशस्वी बिजनेस सुरू करण्यासाठी एक उत्तम आणि वेगळी बिजनेस आयडिया असणे आवश्यक आहे, पण बहुतांश लोकांना एक चांगली बिझनेस आयडिया कशी शोधायची या प्रश्नाचे उत्तर लवकर मिळत नाही,त्यामुळे आपण पाहणार आहोत ती एक चांगली बिझनेस आयडिया कशी शोधायची ?

१ . आपली आवड ओळखा

सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला काय आवडतं याच्याकडे तुम्ही लक्ष दिल पाहिजे. तुमच्या कामातील अनुभव तुमच्या शिक्षण यावर तुम्ही कोणता बिजनेस करू शकता हे अवलंबून असतं. तुम्हाला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीने जर लोकांच्या समस्यांचं निराकरण होत असेल तर ती व्यवसाय कल्पना तुम्ही अमलात आणू शकता. प्रत्येकाला आपल्या आवडीचा व्यवसाय सापडेल असा काही नाही पण आवड असेल तर आपण लवकर निराश होत नाही. जरी एखादं संकट आलं तरी त्याचा सामना आपण अधिक विश्वासाने करू शकतो.

सुरु करा स्वतःचा व्यवसाय ते पण पैश्याविना | How to start a business with no money – आपला बिझनेस

उदाहरणार्थ, तुम्हाला टेक्नॉलॉजीची आवड असल्यास आणि तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये निपुण असाल, तर एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्याचा विचार करू शकता. जर फूड इंडस्ट्रीची आवड असेल आणि तुम्हाला कुकिंगचं कौशल्य असेल, तर तुम्ही एक छोटं कॅफे सुरू करू शकता किंवा स्पेशल कुकिंग क्लासेस घेवू शकता.

तुमच्या अनुभवात आधीच्या मार्केटिंग आणि बिझनेस स्ट्रॅटेजींचं ज्ञान असेल, तर इतर उद्योजकांसाठी कन्सल्टिंग सेवा पुरवणं हेही एक उत्तम मॉडेल ठरू शकतं. या पद्धतीने, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुमचं अनुभव आणि कौशल्य वापरून तुम्ही स्वत:ची बिझनेस ओळख तयार करू शकता.

तुम्हाला या टॉपिक विषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खालील लिंक वर जाऊन पुस्तक वाचू शकता.

https://amzn.in/d/7E4NvBk

२ . बाजारातील समस्या आणि गॅप ओळखा

उदाहरणार्थ जर तुम्हाला खाद्यपदार्थ बनवण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे खाद्यपदार्थ बनवून तुमच्या शहरात देऊ शकता. सध्या बाजारातील ट्रेंड ओळखणे खूप आवश्यक आहे. लोकांची आवडनिवड आणि टेक्नॉलॉजी मध्ये होणारे बदल याचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या बिझनेस साठी एखादी नवीन आयडिया शोधू शकतात. याचबरोबर सोशल मीडिया न्यूज पोर्टल यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला लोकांच्या बद्दल त्या गरजा समजतील. 

३. नवीन ट्रेंड शोधा

आजच्या या इंटरनेट च्या जगात तुम्हाला जर व्यवसाय करायचं असेल तर तुम्हाला या जगात की नवीन घडतंय याची माहिती आसनं खूप महत्वाचा आहे. नवीन टेक्नॉलजी , नवीन ट्रेंडस याची अद्ययावत माहिती घ्यायला शिका. दररोज वर्तमान पत्र, मासिक वाचत रहा, त्यातून आपल्याला काही सुचते का ते बघा.

उदाहरणार्थ, कोरोना काळात “घरून काम” (वर्क फ्रॉम होम) कल्चर जोर धरू लागला होता . तेंव्हा अनेकांनी घरगुती वापरण्याचे आणि आरामदायक कपड्यांचा बिझनेस सुरू केला. अनेक ब्रँड्सने वर्क फ्रॉम होमसाठी खास आरामदायक, प्रोफेशनल दिसणारे पण घरात वापरण्यास योग्य असे कपडे बाजारात आणले, जेणेकरून लोक काम करताना आरामात राहू शकतील पण त्याचवेळी प्रोफेशनलही दिसतील.

अशाच प्रकारे, तुम्ही सध्या लोकप्रिय असलेल्या ट्रेंड्सवर नजर ठेऊन ग्राहकांची आवड, गरज लक्षात घेऊन तुमच्या उत्पादन किंवा सेवांमध्ये सुधारणा करू शकता. उदाहरणार्थ, सध्या शाश्वत (सस्टेनेबल) उत्पादनांबाबत जागरूकता वाढत आहे. तुम्ही इको-फ्रेंडली, बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग वापरून किंवा पुनर्वापराच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून या ट्रेंडचा फायदा घेऊ शकता.

४ .आपल्या निवडलेल्या क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांचे निरीक्षण करा

तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रातील मोठे मोठे उद्योगधंद्यांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या व्यवसायात काही त्रुटी आहेत का ते पाहिलं पाहिजे. आपण इतरांच्या अनुभवातून शिकून त्यांचे फायदे तोटे लक्षात घेऊन, एक नवीन सुधारित बिजनेस मॉडेल तयार करू शकतो.

उदाहरणार्थ, जर तुम्ही स्थानिक वस्त्र उद्योगात बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पारंपरिक कंपड्याना आधुनिकतेची जोड देऊ शकता. त्यामुळे तुम्ही याच क्षेत्रातील यशस्वी ब्रँडचे निरीक्षण करा. त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, डिझाइन्स, आणि कस्टमर सर्व्हिस हे घटक अभ्यासा. त्यात काही त्रुटी किंवा ग्राहकांच्या तक्रारी असल्यास, त्यावर काम करून तुम्ही त्यांच्या पेक्षा चांगली सेवा किंवा उत्पादन घेऊ शकता, जसे की वेगळे फॅब्रिक वापरणं, कस्टम फिटिंग्स ऑफर करणं किंवा घरपोच सेवा देणं.

५ . छोटा मॉडेल सुरू करून पहा

सुरुवातीला तुम्हाला जोही व्यवसाय करायचा आहे त्याचा एक मोठा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एक कमी खर्चात तयार होणारा एक छोटा बिजनेस तयार करा त्यामुळे तुम्हाला कमी पैशांमध्ये त्या व्यवसायातील सगळ्या बारीकसारीक गोष्टी लक्षात येतील. या मॉडेल मुळे तुम्हाला बाजारातील गरज लक्ष्यात येईल. ग्राहकांची नक्की की गरज आहे ही कळेल.

६ . पहिलं पाऊल टाका

आणि सर्वात महत्वचा म्हणजे तुम्ही फक्त विचार न करता तुमच्या व्यवसायसाठी पहिला पाऊल टाकला पाहिजे. जेंव्हा आपण प्रत्यक्ष व्यवसाय करतो तेंव्हा आपल्याला खूप नवीन गोष्टी शिकायला भेटतात. प्रत्येक प्रवास पहिल्या पायरीनेच सुरू होतो. जेंव्हा जेंव्हा वाट अवघड वाटू लागेल तेंव्हा फक्त आपण हा प्रवास का सुरू केला हे आठवा.

संपूर्ण व्यवसाय स्थापनेसाठी एक उदाहरण:

समजा, तुम्हाला ऑनलाइन फॅशन स्टोर सुरू करायचा आहे, जेथे तुम्ही ट्रेंडिंग आणि टिकाऊ फॅशन उत्पादने विकणार आहात. तुम्ही या उद्योगात प्रवेश करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतींचा वापर करू शकता:

१. आपली आवड ओळखा

तुम्हाला फॅशन आणि सस्टेनेबल (टिकाऊ) उत्पादने आवडतात. तुम्हाला एथिकल फॅशन, पर्यावरणपूरक कपडे आणि आधुनिक स्टाइल यांचा संगम पाहायला आवडतो. तुमची आवड फॅशन आणि पर्यावरणाशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्ही टिकाऊ फॅशन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता.

२. बाजारातील समस्या आणि गॅप ओळखा

तुम्ही बाजारात लक्ष देऊन पाहता की अनेक लोक पर्यावरणपूरक आणि टिकाऊ फॅशन उत्पादने शोधत आहेत, पण त्यांना त्यासाठी योग्य आणि विश्वासार्ह ऑनलाइन स्टोअर मिळत नाहीत. त्यांना फॅशनच्या ट्रेंड्सवर चालत, सोबतच पर्यावरणास हानी न करणारे उत्पादने हवी आहेत. इथे एक गॅप दिसतो – टिकाऊ फॅशन स्टोअरची कमी आहे.

३. नवीन ट्रेंड शोधा

आजकाल लोक सस्टेनेबल फॅशनबद्दल जागरूक होऊ लागले आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन शॉपिंगची मागणीही वाढली आहे. ग्राहक प्रामुख्याने जैविक कापड आणि पर्यावरणपूरक उत्पादनांमध्ये अधिक रुचि दाखवत आहेत. तुम्ही ह्या ट्रेंडचा वापर करून ऑनलाइन टिकाऊ फॅशन स्टोअर सुरू करू शकता. तुम्ही सेंद्रिय कापड, इको-फ्रेंडली रंग, पुनर्वापरायोग्य पॅकिंग यासारख्या उत्पादने विकू शकता.

४. आपल्या निवडलेल्या क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांचे निरीक्षण करा

तुम्ही ग्रेटर थिंग्स, Sustainability Store सारख्या इतर टिकाऊ फॅशन स्टोअर्सचे निरीक्षण करता. त्यांच्या वेबसाइट्स, किंमती, उत्पादनांचा प्रकार आणि ग्राहक सेवा पाहता. तुम्ही लक्षात घेतात की त्यांच्याकडे उत्पादने अधिक महाग असतात किंवा कधी कधी पर्यावरणीय प्रभावाबद्दल कमी माहिती दिली जाते. तुम्ही त्यांपेक्षा वेगळे काहीतरी करायचं ठरवता, म्हणजे तुम्ही सस्टेनेबल फॅशन उत्पादनांची विस्तृत माहिती आणि त्यांचा पर्यावरणीय प्रभाव ग्राहकांना स्पष्टपणे सांगाल, आणि ते एक आकर्षक किंमतीत उपलब्ध कराल.

५. छोटा मॉडेल सुरू करून पहा

व्यवसाय सुरू करण्याच्या आधी, तुम्ही पहिले काही महिन्यांत छोट्या प्रमाणावर काम करण्याचा विचार करता. उदाहरणार्थ, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर तुमचा स्टोर सुरू करा. सुरुवातीला तुम्ही १०-१५ प्रकारचे उत्पादने, ज्यात टी-शर्ट, शर्ट्स, हॅट्स आणि इको-फ्रेंडली बॅग्स समाविष्ट असतील, विकू शकता. सोशल मिडियावर प्रचार करा, तुमच्या मित्र-परिवाराला द्यावे आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐका.

६. पहिलं पाऊल टाका

तुम्ही सुरुवातीला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केल्यानंतर, तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो. काही महिन्यांनी, तुम्हाला लक्षात येईल की काही उत्पादने जास्त विकली जात आहेत आणि इतर काही कमी. तुम्ही त्या विकल्या गेलेल्या उत्पादनांचा प्रचंड प्रचार करणे सुरू करता आणि इतर उत्पादने सुधारण्याचा विचार करता. याच प्रक्रियेद्वारे, तुमच्या व्यवसायाची गती वाढवता येते.

उदाहरण:
तुम्ही सस्टेनेबल टी-शर्ट विकण्याचा विचार करत आहात. सुरुवातीला, तुम्ही इंस्टाग्रामवर फोटोज टाकता आणि लोकांना इन्फ्लुएन्सर्सकडून प्रमोशन मिळवता. तेव्हा तुम्हाला काही सकारात्मक प्रतिक्रिया मिळतात आणि लोक तुमचे उत्पादने खरेदी करतात. हळूहळू तुमचा ग्राहक वर्ग वाढतो आणि तुम्ही वेगळ्या पर्यावरणास अनुकूल वस्त्र तयार करणाऱ्यांसोबत भागीदारी करायला सुरुवात करता.

त्यामुळे तुमचं सस्टेनेबल फॅशन स्टोअर एक चांगला व्यवसाय बनवू शकतो, जे ग्राहकांच्या गरजा, ट्रेंड्स आणि बाजारातील गॅप्सच्या आधारावर विकसित होईल.

एक चांगला व्यवसाय सुरू करण्यासाठी आवड, बाजारातील समस्या, ट्रेंड्स, प्रतिस्पर्ध्यांचे निरीक्षण, छोट्या प्रमाणावर सुरूवात आणि पहिले पाऊल टाकणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही नोंद घेऊन, रिस्क कमी करून आणि विश्वासार्हतेवर आधारित व्यवसाय वाढवू शकता.

---Advertisement---

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now