बातम्या
आठवा वेतन आयोग मंजूर: केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
By आपला बिझनेस
—
16 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख निवृत्तीवेतनधारकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.